वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी अनुश्री कांबळी तर उपसभापतीपदी सिद्धेश परब

वेंगुर्ला पंचायत समिती सभापतीपदी अनुश्री कांबळी तर उपसभापतीपदी सिद्धेश परब
राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कायम ठेवत वेंगुर्ला पंचायत समितीवर सभापतीपदी शिवसेनेची अनुश्री कांबळी तर उपसभापती पदी काँग्रेसचे सिद्धेश परब यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीतील बिघाडीमुळे भाजपच्या उपसभापती स्मिता दामले यांना पायउतार व्हावे लागले. सुनील मोरजकर यांचा कार्यकाल संपल्यामुळे सदरची निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे यांनी काम पाहिले. यावेळी नायब तहसीलदार संतोष बांदेकर, गटविकास अधिकारी उमा पाटील, कृषी विस्तार अधिकारी विद्याधर सुतार तसच पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
ही निवड जाहीर होताच शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत घोषणा दिल्या. तर सभापती अनुश्री कांबळी व उपसभापती सिद्धेश परब यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, सचिन देसाई, बाळा दळवी, आबा कोंडस्कर, अजित सावंत, तालुकाप्रमुख यशवंत परब, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, शहरप्रमुख अजित राऊळ, शहर महिला प्रमुख सुकन्या नरसुले, प्रकाश गडेकर, नितीन मांजरेकर, प्रफुल्ल परब, विवेकानंद आरोलकर, पंकज शिरसाट, ईर्शाद शेख, समाधान बांदवलकर, काँग्रेस महिला अध्यक्ष चित्रा कनयाळकर, माजी भोगवे सरपंच महेश सामंत, नगरसेवक प्रकाश डिचोलकर, स्नेहल खोबरेकर, कृतिका कुबल, श्वेता हुले, उद्योजक पुष्कराज कोले, रिक्षा युनियन तालुका अध्यक्ष एकनाथ राऊळ, वेताळ प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. सचिन परुळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu