नगरपरिषदेतर्फे स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव, दि. १२ ते २१ जानेवारी २०२०

स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव

वेंगुर्ला शहराला फार मोठी ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. आपली संस्कृती व परंपरा यांचे जतन व्हावे या उद्देशाने वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे दि. १२ ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत ‘स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव २०२०‘चे आयोजन केले असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि.१२ जानेवारी रोजी सकाळी १० वा. नगरपरिषद जलतरण तलाव येथे वयोगट १०, १४ व १७ वर्षाखालील पुरुष, महिला व खुला तसेच ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक यांच्यासाठी ‘नगराध्यक्ष चषक जलतरण स्पर्धा‘ होणार आहे. १०, १४ व १७ वर्षाखालील गटातील पहिल्या तीन क्रमांकासाठी ५००, ३००, २०० तर खुल्या आणि ५० वर्षावरील गटातील पहिल्या ३ क्रमांकासाठी ७००, ५००, ३०० अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. दि.१६ रोजी दुपारी ३ वा.कॅम्प स्टेडियम येथे ‘नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धा‘ आयोजित केली असून यातील प्रथम ४ विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ५ हजार, २,५०० व २,५०० अशी बक्षिसे देण्यात येतील. दि. १७ रोजी दु. ३ वा.कॅम्प स्टेडियम येथे ‘नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धा (जिल्हा कुमार गट चाचणी स्पर्धा) होणार असून पुरुष गटातील प्रथम चार विजेत्यांना १० हजार, ५ हजार, २,५००, २,५०० तर महिला गटातील प्रथम चार विजेत्यांना ४ हजार, २ हजार, १ हजार व १ हजार अशी बक्षिस देण्यात येतील. दि.१८ व १९ रोजी साई मंगल कार्यालयात ‘नगराध्यक्ष चषक कॅरम स्पर्धा‘ होणार असून यातील प्रथम तीन विजेत्यांना ५ हजार, ३ हजार, १ हजार व १ हजार अशी बक्षिस ठेवण्यात आली आहेत. दि. १९ रोजी राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धा (महाराष्ट्र व गोवा) होणार आहे. यासाठी २१ किमीची हाफ मॅरेथॉन, १० किमीची पॉवर रन व ५ किमीची फन रन अशा गटामध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे. सर्व गटातील प्रथम ३ विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जातील. दि. १९ रोजी दुपारी ३ वा. कॅम्प स्टेडियम येथे ‘नगराध्यक्ष चषक लगोरी स्पर्धा‘ आयोजित केली आहे. यातील प्रथम ३ विजेत्यांना ५ हजार, ३ हजार, १ हजार व १ हजार अशी बक्षिस ठेवण्यात आली आहेत. या सर्व स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी संगीता कुबल (९४२२०७०६३२), पंकज केळुसकर (८४१२८०८६४६) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Close Menu