काका भिसे यांना श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार प्रदान

पत्रकारितेबरोबरच आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या आंबोली येथील पत्रकार महादेव उर्फ काका भिसे यांना जाहीर झालेला यावर्षीचा श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार उद्योजक रघुवीर मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पत्रकारितेबरोबरच आंबोलीतील जैवविविधता, प्राणीजीवन अभ्यासू पर्यटकांसमोर यावे म्हणून ‘मलबार नेचर कन्झरवेशन क्लब मार्फत कार्यरत असलेले तसेच वाईल्ड लाईफ फोटोग्राफर काका भिसे यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्काराने‘ उद्योजक रघुवीर मंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले. रोख ५ हजार रु., सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
युवकांनी जैवविविधतेची माहिती करुन घ्या. त्यात करिअर घडवा. निसर्गाशी मैत्री करुन आदर्श व्यक्ती बनता येते असे प्रतिपादन पुरस्काराला उत्तर देताना काका भिसे यांनी केले.

Leave a Reply

Close Menu