वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छता, क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाला उदंड प्रतिसाद

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित स्वच्छता, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव २०२०चा शुभारंभ आमदार रविद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. तर समारोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. महाराष्ट्रात स्वच्छतेमध्ये सातत्याने पुरस्कार प्राप्त करणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही एकमेव आहे. लोकप्रतिनिधींनी येणा-या काळात जे काही न.प.ने प्रकल्प हाती घेतले त्यासाठी कोणतेही राजकारण न करता निधी द्यावा असे प्रतिपादन आमदार चव्हाण यांनी केले. तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेने भरविलेला स्वच्छता, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव कौतुकास्पद असल्याचे सांगत सुंदरतेचे वरदान लाभलेल्या वेंगुर्ला तालुक्याला पर्यटनदृष्ट्या विकसित होण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट केले.

      वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात १८ जानेवारी रोजी भव्यदिव्य शोभायात्रेने झाली. उद्घाटन भाजपाचे प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण यांच्या हस्ते दाभोली नाका येथे श्रीफळ वाढवून करण्यात आले. या शोभायात्रेमध्ये केपादेवी भजन मंडळ उभादांडा यांचे भजन, सिधुदुर्ग विद्यानिकेतनचे लेझीम पथक, वेंगुर्ला हायस्कूलचे झांज पथक यांच्यासह बॅ.खर्डेकर, होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज,  पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला हायस्कूल, मदर तेरेसा, एम.आर.देसाई, सिधुदुर्ग विद्यानिकेतन तसेच शहरातील वेंगुर्ला नं.१, वेंगुर्ला नं.२, वेंगुर्ला नं.३, वेंगुर्ला नं.४ आणि दाभोस या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. तर वेंगुर्ला नं.२, दाभोस शाळा, वेंगुर्ला नं.३, एम.आर.देसाई, वेंगुर्ला नं.४, वेंगुर्ला नं.१, वेंगुर्ला हायस्कूल व सातेरी महिला बचत गट-देऊळवाडा यांनी आपापले स्वच्छता विषयक जनजाजृती करणारे चित्ररथ सादर केले.

   यावेळी वेतोरे येथील सिधुरत्न ढोल पथक, वेंगुर्ला हायस्कूलचे झांज पथक, विद्यानिकेतनचे लेझीम पथक यांनी सादर केलेल्या वाद्यांच्या तालावरील नृत्य व आकर्षक वादन याबाबत नागरीकांतून कौतुक करण्यात येत होते. तसेच रा.कृ.पाटकर हायस्कूलने सर्वधर्म समभाव या थीमवर पारंपरिक वेशभूषेसहीत कला सादर केली. तर काही चित्ररथांनी कचरा स्वच्छतेबाबत प्रात्यक्षिक दाखवित जनजागृती केली.

या महोत्सवात मॅरेथॉन स्पर्धेत सहकार्य करणारे डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.नामदेव मोरे, डॉ.राजेश्वर उबाळे, प्रदिप वेंगुर्लेकर, राजेश घाटवळ, प्रा. आनंद बांदेकर, संजय पुनाळेकर, कॅलेंडर व पुस्तिका सहकार्याकाबद्दल प्रा. सुनिल नांदोसकर, उत्कृष्ट ग्राफीक्स प्रसाद परब, किरात मुद्रणालय व साप्ताहिक किरात करीता सीमा मराठे, उत्कृष्ट फोटोग्राफर रवी वारग, सलग तीनवेळा ‘सिधुदुर्ग केसरी‘ मिळविल्याबद्दल संदेश रेडकर, ३०० पर्यंत पाढे पाठ असणारा मदर तेरेसा स्कूलचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी विजय तुळसकर (तुळस), नगरपरिषदेला सहकार्य करणारे सचिन वालावलकर, विलास गावडे, प्रसन्ना देसाई, नेट परीक्षेत उत्तीर्ण शामल मांजरेकर, नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सहभागी खेळाडू, नगरपरिषदेचे सर्व स्वच्छता कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी, महोत्सव कालावधीत विविध ‘स्टॅचू‘ साकारणा-या बांदा स्टॅचू ग्रुप यचा आणि आपल्या कलाविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध करीत महोत्सव यादगार करणा-या सेलिब्रेटी कलाकार माधवी जुवेकर, शशिकांत केरकर, प्रभाकर मोरे, किशोरी अंबिये, कविता राम, मेघना एरंडे, अक्षता सावंत, मृण्मयी तिरडकर, अभिजित कोसबी यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu