महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरीकांसाठी (वय 65 वर्षे पूर्ण) गेल्या काही दिवसांत अध्र्या तिकिटात प्रवास करण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी आता स्मार्टकार्ड काढण्याची प्रत्येक प्रवाशास आवश्यकता आहे. मात्र, यासाठी नागरीकांना आवश्यक कागदपत्रे घेऊन महामंडळाच्या कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. एखादे कागदपत्र अपूर्ण अथवा आणले नसल्यास प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हॉस्पीटल नाका, बॅ. खर्डेकर रोड येथील लक्ष्मी नारायण महा-ई-सेवा केंद्र येथे 65 वर्षे पूर्ण झालेल्या महिला, पुरुष प्रवाशांना अध्र्या तिकिटात प्रवास करण्याची सोय असलेले स्मार्टकार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी आधारकार्ड, मतदानकार्ड आदी कागदपत्राबरोबरच मोबाईल नंबरसह स्वत: उपस्थित राहाणे आवश्यक आहे. कोठेही वास्तव्य करणा-या ज्येष्ठ पुरुष व महिला प्रवासी नागरीकांनी या सुविधेच्या अधिक माहितीसाठी व लाभ घेण्यासाठी असे लक्ष्मी नारायण महा-ई-सेवा केंद्रच्या संचालिका समिक्षा वालावलकर (02366-262117) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन वालावलकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu