आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार वेंगुर्ला शहरातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्याचा शुभारंभ २० मे रोजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळनगरसेवक सुहास गवंडळकरश्रेया मयेकरसाक्षी पेडणेकरधर्मराज कांबळीविधाता सावंतसंदेश निकमप्रकाश डिचोलकरतुषार सापळेदादा सोकटेकृतिका कुबलशितल आंगचेकर व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. या गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमाची सुरुवात नगरपरिषदच्या वॉर्ड क्र.१ पासून करण्यात आली. शहरातील प्रत्येक वॉर्डात त्या त्या वोर्डचे नगरसेवकनगरसेविका यांच्या उपस्थितीत गोळ्या वाटप करण्यात येणार आहे. गोळ्या वाटपाबाबतची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu