► गस्तीच्यावेळी दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

तुळस-चुडजीवाडी व जंगल भागातून आलेल्या रेडी चेक पोस्ट अलिकडील रस्त्यावर अशा दोन ठिकाणी वेंगुर्ला पोलीसांनी गस्तीच्या वेळी गाड्यांच्या केलेल्या तपासणीत ३२ हजाराच्या गोवा बनावटीच्या दारूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणांत आरोपीवर मुंबई दारूबंदी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

      रेडी चेकपोस्ट समोरील जंगलमय भागातून शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वेंगुर्ला पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस स्टेशनच्या महिला पोलिस रंजीता चौहानकुडाळचे पोलीस उपनिरीक्षक देसाईरेडी पोलीस दुरक्षेत्राचे ठाणे अंमलदार अजय नाईकपोलीस जितेंद्र कोलतेअजित जाधव या पथकाने उदय तुकाराम परब व अजित केदार यांच्याकडून मॅगडॉल व रॉयलस्टँग नामक गोवा बनावटीच्या दारूने भरलेल्या बाटल्या अशा सुमारे ८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

      तर रविवारी रात्रौ १०.३० वाजण्याच्या सुमारांस पोलीस हवालदार डी.एम.पालकरदादा परबअमर कांडर यांच्यासह पोलीस पथकाने तुळस-वेंगुर्ला रोडवर चुडजीवाडी येथे संशयास्पद रित्या वाटलेल्या पिकअप गाडी नं. ०७–१८११ च्या तपासणीत गाडीमध्ये ज्युपीटर टु व्हीलर व गोवा बनावटीची २५ हजार रूपयांची दारू आढळून आली असून या प्रकरणी गोवा बनावटीच्या दारूसह ४ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना आढळून आलेल्या वेंगुर्ला – पिराचा दर्गा येथील साहद नजीर शेखइरफान अहमंदअली मुल्ला व महंमद शरीफ खलीप यांच्यावर वेंगुर्ला पोलीसांत गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

      वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणांचा अधिक तपास रेडी पोलीस ठाण्याचे अंमलदार अजय नाईक व तुळस-मातोंड विभागाचे बीट अंमलदार डी. बी पालकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Close Menu