कोरोना संकटामुळे देशात लॉकडाउन सुरू आहे .त्यामुळे सिंधुदुर्गात पर्यटन बंदी आहे.असे असतांनादेखील वेंगुर्ला बाजारपेठेत विदेशी रशियन पर्यटक फिरताना आढळले .याबाबत जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली .मात्र प्रशासन यंत्रणेने त्यांना केवळ समज देऊन सोडले.एकीकडे अधिकृत पासशिवाय  महाराष्ट्रातूनच येणार्‍या  नागरिकांना  कारवाईला सामोरे जावे लागत आहे आणि दुसरिकडे  विदेशी पर्यटकांना समज देऊन सोडल्यामुळे  प्रशासनाच्या  या  भूमिकेबाबत  प्रशचिन्ह उभे राहिले आहे.

Leave a Reply

Close Menu