स्नेहा राणेंचे राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत यश

मातृदिन व्हिडीओ ऑनलाईन तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत वेंगुर्ला येथील स्नेहा राणे यांना उत्कृष्ट कवितेचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. राज्यातून सुमारे दोनशे कविता या स्पर्धेसाठी प्राप्त झाल्या होत्या. त्यातून सौ. राणे यांच्या कवितेची उत्कृष्ट पारितोषिकासाठी निवड करण्यात आली. सौ. राणे या कवयित्री व नाट्यलेखिका म्हणून प्रसिद्ध असून त्यांच्या या साहित्यांना यापूर्वी विविध पारितोषिके प्राप्त झाली आहेत. त्यांनी लिहिलेली नाटक रंगभूमीवरही सादर झाली आहेत. या यशाबद्दल साहित्य चळवळीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu