तुळस- वाघेरीवाडी येथील श्रुतिका भागो खरात या सुमारे ५ वर्षाच्या चिमुरडीला गुरुवारी (दि.२१) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कुसडा घणसया जातीच्या सर्पाने दंश केला. सुमारे दोन तास उलटल्यानंतर तिला येथील ग्रामीण रुग्णालयात तिच्या कुटुंबियांनी दाखल केले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने तात्काळ उपचार न झाल्यास कोणताही अनर्थ घडू नये यासाठी वेंगुर्ल्यातील विविध डॉक्टरांच्या टीम ने एकत्र येत या चिमुरडीवर रात्री २ वाजेपर्यंत सतत उपचार सुरु ठेवले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर त्या मुलीचे प्राण वाचले. येथील डॉ.अतुल मुळे यांनी डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.मयूर मणचेकर, डॉ.कोळमकर, डॉ.कपिल मेस्त्री, परीचारीका धोंड व चव्हाण या डॉक्टर टीमच्या सहाय्याने या मुलीचे प्राण वाचवले.

 

Leave a Reply

Close Menu