आमदार वैभव नाईक  यांच्यावतीने दिव्यांग बांधवांना स्कुटरचे वाटप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून राज्यात आ. बच्चू कडू व आ. वैभव नाईक यांनी हा उपक्रम राबवून दिव्यांग बांधवांना एक नवी भरारी घेण्याची संधी  दिली आहे. आ. वैभव नाईक संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत कामगिरी केली आहे
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2019-20 निधीतून  मतदारसंघातील १४ दिव्यांग बांधवांना चारचाकी स्कुटरचे वाटप केले. आज कुडाळ शिवसेना शाखा येथे  आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे,यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्कुटरचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu