►तुळस येथे १० फुट उंचीचे मिरची झाड

कोणतेही रासायनीक खत न वापरता तुळस येथील मधुकर तेंडुलकर यांनी आपल्या परसबागेत १० फुट उंचीचे मिरचीचे झाड वाढविले आहे. या झाडाला सुमारे ७ ते ८ किलो मिरच्या लागल्या आहेत. रस्त्यालगतच हे झाड असल्याने येणा-या जाणा-यांचे लक्ष वेधुन घेत आहेत.

      तुळस-सावंतवाडा येथील रहिवासी मधुकर केशव तेंडुलकर हे आंबा बागेमध्ये काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. आपल्या घराच्या परसबागेत त्यांनी विविध प्रकारची झाडे लावून त्याचे उत्पन्नही ते घेत असतात. उत्पन्न घेताना वेगवेगळे प्रयोग करणे ही त्यांची आवड आहे. २०१९मधील गणेश चतुर्थीमध्ये त्यांनी आपल्या परसबागेत मिरचीचे रोप लावले होते. त्या मिरचीच्या रोपासाठी कोणतेही रासायनिक खत न वापरता सागवान वृक्षाचे पाने जाळून त्यामध्ये गोवर मिक्स करुन त्याचे खत म्हणून वापर केले. एप्रिल २०२०मध्ये सदर मिरचीच्या झाडाची उंची तब्बल १० फुट वाढली आहे. या झाडाला ७ ते ८ किलो मिरच्या लागल्या आहेत. यापूर्वी त्यांनी टॅमेटोचे साडेसहा फुट झाड वाढविले होते. 

      निसर्गाने आपल्याला साथ दिल्याने हे मिरचीचे झाड १० फुट वाढविणे शक्य झाल्याचे तेंडुलकर सांगतात.

Leave a Reply

Close Menu