‘आंगण ते रणांगण‘ आंदोलनाच्या यशामुळे बाळू परब यांच्या पायाखालची वाळू सरकली- भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर

भाजपाच्या आंगण ते रणांगण‘ आंदोलनाला वाढता पाठिंबा बघून शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब बिथरले आहेत. ठाकरे सरकारच्या गलथानभोंगळ कारभार विरोधात वेंगुर्ला तालुक्यातील रेडीपासून परुळेपर्यंत जवळजवळ ७३ बुथवर कार्यकर्त्यांनी आपल्या अंगणात तसेच सार्वजनिक ठिकाणी ठाकरे सरकारचा निषेध करत काळ्या फितीकाळे झेंडेकाळे कपडे व सरकारच्या विरोधातील फलक हातात घेऊन आंदोलने केली त्यामुळेच सैरभैर होऊन शिवसेना तालुका प्रमुखांनी टिका केली असल्याचे भाजपाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी प्रसिद्धपत्रकातून म्हटले आहे.

      भाजपाने राज्य सरकारच्या विरोधात आंगण ते रणांगण‘ आंदोलन केले. या विरोधात वेंगुर्ला तालुकाप्रमुख शिवसेना प्रमुख बाळू परब यांनी प्रसिद्धीपत्रकातून भाजपावर तोफ डागली. त्यावर भाजपाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून आपले म्हणणे प्रसिद्ध केले आहे.

      गवंडळकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे कीमुळात महाराष्ट्राची सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेने कोणाकोणाचे पाय धरले हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे भाजपा पक्षावर टीका करण्याचा अधिकार तालुका प्रमुखांना नाही. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे झालेल्या तालुकाप्रमुख बाळू परब यांची निष्ठा ही पक्षापेक्षा दिपकभाईंवर आहे हे तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिकांना माहीत आहे. त्यामुळे यापुढे निष्ठेच्या गोष्टी शिकवू नये.

      तसेच वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप हे भाजपाच्या अधिकृत कमळ निशाणी घेऊन शिवसेनेचा पराभव करुन निवडून आलेले आहेत. त्यामुळे पक्षाचा संबंध नाही असे नगराध्यक्ष म्हणूच शकत नाही. तसेच ते सर्वसमावेशक असल्यामुळे सर्व राजकीय लोकप्रतिनिधींसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते पालकमंत्री कायकुठल्याही लोकप्रतिनिधींसोबत काम करण्यासाठी तयार असतात.

      बाळू परब यांनी याबाबत माजी पालकमंत्री दिपकभाई केसरकर यांचे मार्गदर्शन घ्यावे. कारण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना पालकमंत्री म्हणून असलेले दिपकभाई केसरकर हे जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे निधी साठी जात होते. व त्यामुळेच त्या सरकारच्या काळात सिंधुदुर्गात भरघोस निधी आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या सलोख्याच्या संबंधाचाही फटका दिपकभाईंना बसला व त्यामुळेच त्यांना ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान मिळू शकले नाही आणि कोण कोणाचे बोट धरुन मोठे होत नसते तर ज्यांच्यात धमक व कुवत असते तेच मोठे होतात.

      आज भाजपा पक्ष राज्यात सर्वाधिक पक्षाची कमळ‘ ही निशाणी घेऊन निवडून आलेल्या अमदारांचा पक्ष आहे. त्यामुळे वरिष्ठांना खुश करण्यासाठी टिका करु नका. मागची पाच वर्षे शिवसेनेच्या आरोग्यमंत्र्यांमुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्याच्या बाबतीत वाताहत झाली आहे. तुम्ही निवडून आलेल्या पंचायत समिती मतदार संघात साधी सॅनिटायझर मशिन नाही की टेंम्परेचर गन नाही ती आधी उपलब्ध करा आणि मगच टिका करा असाही टोल गवंडळकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे.

Leave a Reply

Close Menu