चौधरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सॅनिटायझर मशिन भेट

वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयास वालावल येथील मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने सॅनिटायझर मशिन भेट देण्यात आली. कार्यालयात प्रवेश करताना हाताचा स्पर्श न करता सॅनिटायझरचा वापर करता येईल अशा अत्याधुनिक मशिन या दोन्ही कार्यालयांना ट्रस्टतर्फे भेट देण्यात आल्या.

      पॅडलचा वापर करुन सॅनिटायझरचा उपयोग करता येणारी ही मशिन असून कार्यालयात येणा-या कर्मचारी व नागरिकांना आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मशिन उपयुक्त ठरणारी आहे. तहसीलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी उमा पाटिल, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, निवडणुक नायब तहसिलदार संतोष बांदेकर, नायब तहसिलदार नागेश शिंदे, मंडल अधिकारी व्ही.जी.जाधव, ट्रस्टचे सचिव संदिप साळसकर यांच्या उपस्थितीत या मशिनचे उद्घाटन तहसीलदार कार्यालय येथे करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu