►वेंगुर्ल्यातील ११८ मजूर उत्तर प्रदेशला जाण्यासाठी रवाना

वेंगुर्ला तालुक्यातून तहसीलदार यांच्याकडे नाव नोंदलेल्या ११८ मजुरांना ६ गाड्यातून उत्तर प्रदेशाला जाण्यासाठी वेंगुर्ला बस स्थानकातून पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ओरोस रेल्वे स्थानकावर मार्गस्थ करण्यात आले.

    वेंगुर्ला तालुक्यातील या सर्व मजुरांना ते असलेल्या ठिकाणाहून बसमधून वेंगुर्ला एस.टी.स्थानकावर आणण्यात आले. त्याठिकाणी वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार नागेश शिंदे व निवडणूक नायब तहसीलदार संतोष बांदेकर या तहसील प्रशासनाने सर्व मजुरांची नोंदणीप्रमाणे आधारकार्डची तर आरोग्य विभागातील टेक्निशियन श्रीपाद ओगले, कर्मचारी लहू धामणकर, तुषार वराडकर यांनी सर्व मजुरांची आरोग्य तपासणी केली. वेंगुर्ला पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे ११८ ही उत्तर प्रदेशातील मजुरांची तपासणी पटापट होऊन नियोजित वेळेत उत्तर प्रदेशात रेल्वेने जाण्यासाठी वेंगुर्ला आगाराच्या बसमधून रेल्वे स्टेशनला रवाना झाले.        

         सदर उत्तर प्रदेशातील मजुर हे गोरखपुर, सिद्धार्थनगर, बस्तिया व बालिया या जिल्ह्यात जाणारे आहेत अशी माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली. यावेळी तहसीलदार कार्यालयातील निलेश मयेकर, तलाठी श्री. सरोदे, खानोली तलाठी चव्हाण, श्री.आरोसकर तसेच पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, पोलीस सुरेश पाटील, प्रमोद काळसेकर, अमर कांडर या सर्व पोलिस कर्मचारी तसेच आगार व्यवस्थापक एस.जी.चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu