►हापूस आंबा एसटीने पहिल्यांदाच जिल्हयाबाहेर

वेंगुर्ला परिसरातील आंबा बागायतदारांचा आंबा एसटीच्या माध्यमातून नाशिकच्या पंचवटी बाजारपेठेत रवाना झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच एस टी ची आंबा वाहतुक सेवा सुरु केली आहे. बागेतुन काढलेला आंबा थेट बागेतून एसटी बसने बाजारपेठेमध्ये नेला जात असल्याने या वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचा लाभ अन्य आंबा शेतकरी, बागायतदार व व्यावसायिक यांनी घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
         आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदार यांनी एसटीच्या विविध वाहनांबाबत इच्छुकता दर्शविली. त्यानुसार एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी मार्गदर्शन व नियोजन करून ही वाहने उपलब्ध करुन दिली. त्यामूळे नाशिक येथे जाणाऱ्या आंबा पेट्यांसाठी थेट शेतकरी याच्या आंब्याच्या बागेतून आंबा पेट्या घेऊन नाशिक येथे एस टि बस रवाना झाली. या सेवेचा अन्य बागायतदारानी फायदा घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला एसटी आगार प्रमुख जी. एस. चव्हाण यांनी केले आहे.
           यावेळी ३५० आंबा पेट्या नाशिकला रवाना करताना  डेपो मनेजर जी एस  चव्हाण, स्थानक प्रमुख निलेश वारंग, चालक व्ही एस पेडणेकर, आर वाय आरोलकर, लता गुडस ट्रान्सपोर्ट चे मालक जगन्नाथ सावंत, प्रीतम सावंत सह  सुनील गावडे, नवनाथ सावंत, प्रमोद गावडे, केतान आरावुज, बाब्या गावडे , भुषण सावंत, एम्रोज आरावुज, सतिश गावडे ,विशाल म्हापसेकर,नितीन तेली यानी सहकार्य केले.

Leave a Reply

Close Menu