►मातोंड येथे एक कोरोना पॉझिटिव्ह

सिधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून यात वेंगुर्ला तालुक्यातील मातोंडमधील एकाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हा व्यक्ती १८ मे ला मुंबईवरुन गावात दाखल झाला होता. येथील एका प्राथमिक शाळेत त्याला संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले होते. यानंतर त्याला काही लक्षणे आढळू लागल्याने २० मे ला ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. २१ मे ला त्याचा स्वब घेण्यात आला होता. आज त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता या रुग्णाच्या संपर्कातील १० व्यक्तींना ओरोसला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. या व्यक्तीसोबत त्या १० व्यक्ती शाळेत संस्थात्मक विलगिकरणात होत्या. दरम्यानया सर्वांची प्रकृती आता चांगली असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन वेंगुर्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी केले आहे.

      दरम्यानत्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीसोबत त्याची बायको२ मुलेभाऊभावजय व पुतणे हे सुद्धा त्यांच्यासोबत मुंबई वरुन मातोंड-मिरीस्तेवाडी येथील प्राथमिक शाळेत विलगिकरणात होते. तसेच त्यांच्या सोबत अजूनही ४ व्यक्ती असे मिळून हे सर्व ११ जण त्याच शाळेत विलगिकरणात ठेवण्यात आले होते. यामुळे या व्यक्तीच्या संपर्कातील इतर १० जणांना तपासणीसाठी ओरोस याठिकाणी नेण्यात येणार आहे.

      यावेळी तहसीलदार प्रविण लोकरेगटविकास अधिकारी उमा पाटीलपोलीस निरीक्षक तानाजी मोरेतालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकरसरपंच जानवी परबग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकरतलाठी एस.पी.गवसकृषी सहाय्यक चंद्रशेखर रेडकरमातोंड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभूआरोग्यविका श्रीमती कांबळेश्री.मेस्त्री यांनी येथील प्राथमिक शाळेच्या ठिकाणी पाहणी केली.

      कोरोना रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने पाहणी केल्यानंतर ‘‘त्या‘‘ प्राथमिक शाळेच्या ३०० मी अंतरावरील परिसरात तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी कंटेंटमेंन्ट झोन जाहीर केला.

Leave a Reply

Close Menu