प्रलंबित उमेदवारांना भरतीत थेट नियुक्ती द्यावी – सभापती कांबळी

वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक बैठक बॅ.नाथ पै सभागृहात सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती सिद्धेश परब, यशवंत परब, सुनिल मोरजकर, श्यामसुंदर पेडणेकर, मंगेश सामंत, साक्षी कुबल, स्मिता दामले, गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्यासह आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, शिक्षण आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला सभापतींनी कोरोना पार्श्वभूमीवर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य व इतर सर्व विभागांच्या कर्मचारी अधिका-यांचे अभिनंदन केले.

      कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात मोठी भरती प्रस्तावित आहे. या भरतीत सुमारे दीड वर्षांपूर्वी आरोग्य विभागाकडे ज्या उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज भरलेत तसेच परिक्षा शुल्क भरले. परंतु त्यांच्या अजून परिक्षा झाल्या नाहीत अशा उमेदवारांना आताच्या भरतीत विशेष बाब म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी असा ठराव सभापती अनुश्री कांबळी यांनी मांडला.

      तालुक्यातील एका शाळेत कॉरन्टाईन होण्यासाठी आलेल्या संबधित लोकांना सुमारे एक तास शाळेची चावी नसल्याने ताटकळत उभे राहावे लागले होते. यावेळी गटविकास अधिकारी यांनी संबधित शाळेच्या शिक्षिकेस याबाबत मोबाईलद्वारे संफ साधला होता. त्यावेळी सदर शिक्षिकेने गटविकास अधिकारी यांना बेजबाबदारपणे उत्तरे दिलीत या विषयांवर सभागृहात जोरदार चर्चा झाली. यावेळी गटविकास अधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना कडक शब्दांत सुचना दिल्या तसेच सुनिल मोरजकर यांनी संबधित शिक्षिकेवर काय कारवाई करणार, गटशिक्षणाधिकारी यांनी अशांना पाठीशी घालू नये त्यांना कारणे दाखवा नोटीस द्या असे सांगितले.

Leave a Reply

Close Menu