वेंगुर्ला नगरपरिषदेचा आरोग्य विषयक स्तुत्य उपक्रम

शहरातील क्वॉरंटाईन व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी तसेच इतरही नागरीकांना संसर्गाचा धोका कमी व्हावा या उद्देशाने वेंगुर्ला शहरातील ४५०० कुटुंबातील सुमारे १४ हजार नागरीकांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक औषधाचे घरोघरी वाटप करण्यात आले. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार अशाप्रकारचे होमिओपॅथीक औषध वाटप करणारी वेंगुर्ला नगरपरिषद पहिली नगरपरिषद ठरली असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.

      वेंगुर्ला शहरातील नागरीकांच्या आरोग्याचे हित जोपासण्याला नगरपरिषदेने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या कामी सर्वोतोपरी सहकार्य करणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व प्रशासकीय कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांचे नगराध्यक्ष गिरप यांनी आभार मानले. स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत जसे सर्वांनी एकजुटीने काम करुन यश मिळविले त्याच पद्धतीने सर्वांची एकजूट कायम राखत कोरोनासारख्या जागतिक संकटावर आम्ही मात करु असा ठाम विश्वासही नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Close Menu