►वेंगुर्ल्यात घरोघरी वटपौर्णिमा साजरी

वेंगुर्ला तालुक्यात ५ जून रोजी ठिकठिकाणी वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आला. काही ठिकाणी वडाच्या झाडाकडे एकत्र येत तर काही ठिकाणी घरोघरी वडाची फांदीचे पूजन करुन महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. कोरोनाचे सावट असले तरी महिलांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण दिसून येत होते.

      हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस ‘‘वटपौर्णिमा‘‘ म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हा सण उत्साहात साजरा झाला. कोरोनााचे संकट या सणावर असले तरी हा सण साजरा करताना महिलांच्या चेह-यावरील आनंद ओसंडून वाहत होता. पण काही ठिकाणी लॉकडाऊनमुळे हा सण घरातच साजरा करण्यात आल्याने काही महिलांमध्ये नाराजी दिसून आली. दरम्यान, तालुक्यात काही ठिकाणी घराशेजारील वडाकडे जात सोशल डिस्टसिगचे पालन करुन व तोंडाला मास्क बांधून वटपौर्णिमा साजरी केली.

Leave a Reply

Close Menu