काम बंद पाडून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – नरेश बोवलेकर

दाभोली-खानोली रस्ता गेले १५ दिवस सुरू होता व गेले २ दिवस पाऊस पडल्याने काम अर्धवट राहीलेले व धोकादायक वळणावरील काम करण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर ठेकेदार आले असता ते काम पुर्ण करत असताना पाऊस आला. त्यावेळी जि.प.अध्यक्ष आले असता काम बंद करण्यास भाग पाडले व काम बंद पाडून फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप दाभोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य नरेश बोवलेकर यांनी केला.

      दाभोली-वेतोरे-कुडाळ रस्ता डांबरीकरण होण्यासाठी दाभोली खानोली-वेतोरेवासीयांनी ३ वेळा रास्ता रोको आंदोलन केले. मात्र एकही वेळा आडेली जिल्हापरिषद सदस्या व आत्ताच्या जिल्हापरिषद अध्यक्षा त्या ठिकाणी आल्या नाही. दरम्यानदाभोलीमार्गे कुडाळ मार्गावर दाभोली झिरो पॉईंटपासून ते पुढे वेतोरा दिशेने सुमारे ५०० मीटर दोन्ही बाजूने रस्त्याचे काम झाले होते. त्यापुढे फक्त ३०० मीटरचा रस्ता हा एकाच बाजूने डांबरीकरण केला होता. चढण आणि वळण असलेल्या या रस्त्यावरुन जाताना प्रवासी या एका बाजूच्या चांगल्या रस्त्याचा वापर करत होते. याठिकाणी अपघात होऊ नये आणि वेताळबांबर्डे अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दाभोली ग्रामस्थांच्यावतीने नरेश बोवलेकर यांनी सदर ठेकेदाराशी संफ साधून ३०० मीटरच्या रस्त्याची दुसरी बाजू खडीकरण व डांबरीकरण करण्यास सांगितले. त्यानुसार ठेकेदारांनी सदरचे काम सुरु केले होते. मात्र ग्रामस्थांच्या मागणीनुसार धोकादायक रस्त्यांचे काम पूर्ण करण्याच्या ईराद्याने आलेल्या ठेकेदारास आपल्या पदाचा अधिकार वापरुन पावसाळ्याचे कारण सांगून काम बंद करण्यास भाग पाडुन मिडियाच्या माध्यमातुन पाठ थोपटवुन घेत आहेत. ग्रामस्थांच्यादृष्टीने आवश्यक असलेले काम थांबविण्यापेक्षा आपल्या आडेली जिल्हापरिषद मतदार संघातील भानुदास मोर्जे खुन प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले दाभोली उपसरपंच १३८ दिवस ग्रा.पं.ची कुठलीही रजेची पूर्व परवानगी न घेता जेल मध्ये होते. वास्तविक ग्रा.पं. अधिनीयम कलम १९५८ चे कलम ४० १अ नुसार अपात्र होतो. सदर प्रस्ताव जि.प.कडे पाठवुन १० महीने अध्यक्षांच्या टेबलावर अजुनही धुळ खात का पडला आहेह्याचे उत्तर प्रथम दाभोलीवासीयांना द्यावे व नंतर दाभोली गावातील विकास कामे थांबवावीत असा संतप्त सवाल दाभोली वासीय करत आहेत असे प्रसिद्धपत्रकात नरेश बोवलेकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Close Menu