वेंगुर्ला राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्षपदी विधाता सावंत

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची नूतन कार्यकारणी नुकतीच जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी जाहीर केली. यात वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक विधाता सावंत यांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे नेते तथा कार्याध्यक्ष विलास गावडेजिल्हाध्यक्ष बाळा गावडेमावळते तालुकाध्यक्ष हिरोजी उर्फ दादा परबप्रवक्ते इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर काँग्रेस पदाधिकारी यांच्या मदतीने तालुक्यात जुन्यानव्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे यावेळी श्री. सावंत यांनी सांगितले.

      विधाता सावंत यांनी मागील पक्षाच्या पडत्या काळात विलास गावडेदादा परबइर्शाद शेखप्रकाश डिचोलकर व इतर पदाधिकारी यांच्या सहकार्याने काँग्रेसचे काम जोमाने सुरु ठेवले होते. यामुळे जिल्हा कार्यकारणीने त्यांना तालुकाध्यक्षपद देऊन त्यांचा सन्मान केला. यानिमित्त मावळते तालुकाध्यक्ष दादा परब यांनी नूतन तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांचे अभिनंद केले.

Leave a Reply

Close Menu