चर्मवाद्ये दुरुस्ती व्यावसायीकांवर टांगती तलवार

कोकणात भजन हा कलाप्रकार सर्रास वर्षभर दिसून येतो. मात्र, गणेशोत्सवात याचे प्रमाण वाढलेले असते. पण त्याबरोबरच अखंड भजनी सप्ताह, श्रावण महिन्यातील विविध पूजा आदींसाठी ठिकठिकाणी भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भजन कलाप्रकारात चर्मवाद्यांची आवश्यकता महत्त्वाची असते. त्यामुळे जूनपासून चर्मवाद्ये बनविण्याच्या कामाला कारागीर सुरुवात करतात. मात्र, यावर्षी कोरोनाची झळ या चर्मवाद्ये दुरुस्ती व्यवसायालाही बसण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन व्यवहार सुरु झाले असले तरी येथील सण व सार्वजनिक उत्सवांबाबत अजून ठोस निर्णय झालेला नसल्याने चर्मवाद्ये दुरुस्ती व्यवसायीकांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढ्यात चर्मवाद्ये दुरुस्तीची कामे सुरु होणार होती. मात्र, ती अद्याप झालेली नाही. सण व उत्सव साजरे करण्यासाठी शासन परवानगी देईल याकडे या व्यावसायीकांचा लक्ष लागून आहे. परंतु, तोपर्यंत तर या व्यवसायीकांवर सध्यातरी टांगती तलवार राहणार आहे.

————————————————————————————

चर्मवाद्ये दुरुस्ती व्यवसायावर केवळ आमचेच नव्हे तर काही कारागीरांचेही घर चालते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा व्यवसाय अडचणीत आला आहे. सरकारने या गोष्टी चा गांभिर्याने विचार करुन आम्हाला व आमच्या कारागिरांच्या कुटुंबांचा सहानभुतीपुर्वक विचार करावा.

– भाई खानोलकर, खानोली (स्वर संगीत तबला मेकर, वेंगुर्ला)

Leave a Reply

Close Menu