►वेंगुर्ल्यात आत्तापर्यंत ४२७.२ मि.मी. पावसाची नोंद

निसर्गचक्रीवादळानंतर वेंगुर्ल्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. ऊन आणि पाऊस यांचा चाललेला लपंडाव नागरिकांना पहायला मिळत होता. मात्र, गुरुवारी (दि.११) रात्रीपासून वा-यासह सुरु झालेला पाऊस शुक्रवारीही (दि.१२) काहीशी उसंत घेत मनसोक्त बरसत आहे. तसेच तलाव, विहिरी आदींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दोन दिवस पडणा-या या पावसाने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.  १ ते १२ जून या कालावधीत एकूण ४२७.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

 

Leave a Reply

Close Menu