राष्ट्रवादीतर्फे वेंगुर्ल्यातील कोव्हीड योध्यांचा सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वेंगुर्ला तालुक्यात चांगली सेवा देणा-या विविध खात्यातील कोव्हीड योध्यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयातील मुख्य नर्स आश्लेषा काणेकर, आरोग्य सेविका विनीता तांडेल, वेंगुर्ला पोलीस स्टेशन मधील पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, पोलीस उपनिरीक्षक रुपाली गोरड, हेड काँन्स्टेबल रंजिता चौहान, रुपा वेंगुर्लेकर तर वेंगुर्ला न.प.मुख्याधिकारी वैभव साबळे व प्रशासकीय अधिक्षक संगीता कुबल यांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य नितीन कुबल, प्रांतिक सदस्य एम.के. गावडे, तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर, वामन कांबळे, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, महिला तालुकाध्यक्ष दिपिका राणे, शहर महिलाध्यक्ष सुप्रिया परब, योगेश कुबल उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu