हरिचरणगिरी मठाच्या भक्तनिवास मध्ये क्वारंटाईन असलेल्या कुडाळ-पाट येथील विश्वनाथ रामचंद्र प्रभू (५५) यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज (दि.१६) सकाळी निधन झाले. दरम्यान या व्यक्तीला कोणतीही कोरोनाची लक्षणे या अगोदर नसल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.

      विश्वनाथ प्रभू हे आपली बायको व मुलगी यांच्या समवेत मुंबई वरुन ११ जूनला आले होते. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होत व याबाबत त्यांच्यावर औषध उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांना अचानक भरपूर घाम येऊन शौचाला झाले. शौचालयातून ते बाहेर आल्यानंतर ते तिथेच कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान यानंतर घटनास्थळी तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर दाखल होत त्यांची तपासणी करून त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले. पाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu