वेंगुर्ल्यात दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व कलमे निर्मिती प्रकल्प

कोकणातील शेतकरी वर्गाच्या हितार्थ डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व लुपिन फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील दुर्लक्षित औषधी वनस्पतींचे संवर्धन व दर्जेदार रोपे/कलमे निमिर्ती हा प्रकल्प वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे कोकणातील शेतक-यांचा सामाजिक आर्थिक स्तर उचवण्याच्या दृष्टीने हा प्रामाणिक प्रयत्न असल्याची माहिती प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत व लुपिन फाउंडेशनचे अधिकारी योगेश प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

      या अनुषंघाने डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली व लुपिन फाउंडेशन, सिंधुदुर्ग यांच्यामध्ये २३ ऑगस्ट २०१८ रोजी सामंजस्य करार पार पडला. या प्रकल्पामुळे पिकांची लागवड, उत्पादन, रोपवाटिका, प्रक्रिया व विक्रीद्वारे कोकणातील सुशिक्षित बेरोजगारांना, युवकांना व महिला वर्गाला नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

      पत्रकार परिषदेवेळी वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.दळवी, लुपिन फाऊंडेशनचे कृषी अधिकारी प्रताप चव्हाण, कनिष्ठ उद्यानविद्यावेत्ता डॉ.एम.पी.सणस, लुपीन फाऊंडेशनचे संतोष कुडतरकर, कनिष्ठ संशोधन छात्र डॉ.नागेश गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu