तुळस उपसरपंचपदी सेनेचे सुशिल परब

तुळस उपसरपंचपदाच्या निवडीत शिवसेनेचे सुशिल परब सहा विरुद्ध पाच मतांनी विजयी झाले. त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकात उत्साहाचे वातावरण आहे.

      तुळस ग्रामपंचायतमधे ११ सदस्यांपैकी भाजपप्रणित सहासेनाप्रणित चार व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल असताना अनपेक्षितरित्या परब विजयी झाल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भाजपतर्फे शेखर तुळसकर तर सेनेतर्फे सुशिल परब यांनी नामनिर्देशन पत्र भरले होते. परब यांना ६ तर तुळसकर यांना ५ मते पडली. नूतन उपसरपंच परब यांच्या निवडीनंतर वेंगुर्ला पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

    यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परबग्रा.पं.सदस्य सोनू आरमारकरसंजना परबहर्षदा नाईकशहरप्रमुख अजित राऊळम्हाडा सदस्य सचिन वालावलकरसुनिल डुबळेमाजी सरपंच आप्पा परबविभागप्रमुख संजय परब व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  निवडणुक निर्णायक अधिकारी म्हणून डी.एस.चव्हाण यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Close Menu