►मुंबई प्रवासासाठी वेंगुर्ल्याच्या लालपरी सज्ज

वेंगुर्ला आगारातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा ते मुंबई असा प्रवास करु इच्छिणा-यांना खुशखबर देण्यात आली आहे. यासाठी विठाई एक्सप्रेस आणि साई मानसिश्वर या दोन लालपरी वेंगुर्ला-शिरोडा ते बोरिवली पर्यंतच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत, अशी माहिती वेंगुर्ला आगार प्रमुख एन.डी.वारंग यांनी दिली. शिरोडा, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, राजापूर, लांजा, हातखांबा, संगमेश्वर, चिपळूण, महाड, माणगाव, पेण, पनवेल, खारघर, तुर्भेनाका, कालवा, ठाणे, मुलुंड, भांडुप, चेंबूर, सायन, दादर, परेल, बांद्रा, अंधेरी, मालाड, गोरेगांव, कांदिवली, बोरिवली असा सदर बसचा प्रवास असणार आहे.

      शासनाच्या नियमानुसार बसमधील प्रवासी संख्या २२ असणार आहे, तसेच बस मधील २२ सिटचा ग्रुप पूर्ण झाल्यानंतरच बस सुटणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यायची आहे. तसेच प्रवासात आधार कार्ड, मेडिकल सर्टिफिकेट सोबत असणे आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे तिकिट दर शिरोडा ते बोरिवली ३४०० रुपये, वेंगुर्ला ते बोरीवली ३३०० रुपये असे ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, ज्यांना बुकिग करायचे आहे, त्यांनी ०२३६६-२६२०३८, किंवा ९४२२५८५८५९ या क्रमांकावर संफ साधावा, असे आवाहनही एन.डी. वारंग यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Close Menu