कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉक २ अंतर्गत ३१ जुलै पर्यंत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तसेच जिल्ह्यात क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीं व्यतिरिक्त रुग्ण आढळत असल्याने जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन अधिकच कडक केले आहे. यावेळी आज वेंगुर्ला बाजारासहीत तालुक्यातही लॉकडाऊन पाळण्यात आले. तर पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर तालुक्यात पेट्रोलिंग टीमही पाठवण्यात आली होती.

    दरम्यान या लॉकडाऊन बाबत वेंगुर्ला तालुक्यात नागरिक व व्यापा-यांतुन नाराजीचे सूर उमटले. मार्च पासून आज पर्यंत शिस्तीचे पालन करून व प्रशासनाला साथ दिली. यामुळे आर्थिक अडचणीला आम्हाला सामोरे जावे लागले. मात्र आता तालुक्यात रुग्ण नसताना इथले लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Close Menu