शेतीला हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करु-समिधा नाईक

         महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती वेंगुर्ला आणि प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला आयोजित कृषिदिन २०२० अंतर्गत ‘‘कृषी संजीवनी सप्ताह शुभारंभ‘‘ कार्यक्रम प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे १ जुलै रोजी संपन्न झाला. यावेळी जि.प.अध्यक्ष समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, पं.स.सभापती अनुश्री कांबळी, जि.प.वित्त व बांधकाम सभापती रविद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बालविकास सभापती माधुरी बांदेकर, जि.प.सदस्य दादा कुबल, प्रितेश राऊळ, कृषी समिती सदस्य सुनिल नकाशे, माजी सभापती यशवंत परब, सुनील मोरजकर, जिल्हा कृषी अधिकारी म्हेत्रे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.अडसूळे, उपसभापती सिद्धेश परब, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत, तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, गटविकास अधिकारी उमा घारगे- पाटील, प्रगतशील शेतकरी संतोष गाडगीळ सहित शेतकरी व कृषी विभाग कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

      महाराष्ट्रात आधुनिकता आणि शेतीक्रांती ही ख-या अर्थाने कै. वसंतराव नाईक यांनी केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आता शेतीकडे वळत आहेत. कोरोनामुळे तरुण वर्ग शेतीकडे वळू लागला आहे. जिल्हा परिषद नेहमीच त्यांच्या सोबत राहील. शेतीला चांगला हमीभाव देण्याचा प्रयत्न आम्ही करु. कृषी विभागाशी निगडित सर्व योजनांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा असे केले आवाहन असे आवाहन जिल्हापरिषद अध्यक्ष समिधा नाईक यांनी वेंगुर्ला येथे केले.

      यावेळी राज्यशासनाचा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शिवराम गोविद गोगटे, कोरोना योद्धा म्हणून वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मेस्त्री यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शेती अवजारे लाभार्थी श्याम नवार (उभादांडा) यांना ग्रासकटर, संतोष सावंत (परबवाडा) यांना पॉवर स्पे, समीर विटेकर व एकनाथ परब (दोन्ही वजराठ) याना ग्रासकटरचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विभाग जिल्हापरिषदचे मोहीम अधिकारी संजय गोसावी यांनी केले.

 

Leave a Reply

Close Menu