► पावसामुळे ठिकठिकाणी पडझाड

वेंगुर्ले तालुक्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासाहित पडलेल्या मुसळधार पावसामुळे दाभोसवाडा येथील फर्नाल डिसोजा यांचे घर कोसळून नुकसान झाले. तर तालुक्यातील निवती, केळुस व होदवडे तुळस गावांना जोडणाऱ्या मुख्यरस्त्यावरील पुलांवर पाणी आल्याने काही तास वाहतूक खोळंबली होती. दरम्यान आज सकाळपासून काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतल्याने वाहतूक सकाळपासून सुरळीत सुरू होती. दरम्यान शहरात भटवाडी पेट्रोलपंप नजीक झाड कोसळून नुकसान झाले तर शिरोडा नाका येथील श्रीकृष्ण मालवणकर यांच्या घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले. दरम्यान गेल्या २४ तासात तालुक्यात १४५.४ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १५७१.२ मिमी एवढा पाऊस तालुक्यात पडला असल्याची माहिती वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडून देण्यात आली.

Leave a Reply

Close Menu