अखिल भारतीय कोकणी परिषदेच्यावतीने ८ जुलै रोजी कोकणी भाषेचा ८३वा वर्धापनदिन ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार आहे. यातील परिसंवादासाठी आचारा येथील लेखक आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांना निमंत्रित केले आहे. या परिसंवादात देश-परदेशातील कोकण भाषातज्ज्ञ सहभागी केले आहेत. श्री. ठाकूर हे ‘कोविड-१९ नंतरची कोकणी‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन इंडियन रेड क्रॉस हॉल महानगरपालिका पणजी-गोवा येथे राजभाषा संचलनालयाच्या संचालक मेघना शेटगांवकर यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अध्यक्ष उषा राणे यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu