सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला-उभादांडा गावचे सुपुत्र व मातोंड हायस्कूलचे उपशिक्षक अॅन्थोनी अॅलेक्स डिसोझा यांची आशिया खंडातील सर्वात मोठ्या १०० वर्षे पार केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण व कृषी मंत्री असलेले राष्ट्रीय नेते शरद पवार हे अध्यक्ष असलेल्या संस्थेवर अॅन्थोनी डिसोझा यांची निवड झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

       या आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेवर महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात मंत्रिपद भुषविणा-या व भुषविलेल्या आणि प्रख्यात असलेल्या अजित पवार, डॉ.अनिल पाटील, अॅड. भगिरथ शिदे, दिलीप वळसे-पाटील, अॅड.रविद्र पवार, रामशेठ ठाकूर, मिनाताई जगधने, डॉ. विश्वजीत कदम, प्रभाकर देशमुख, दादाभाऊ काळसेकर, बाळासाहेब भोस, मुमताच अली शेख, डॉ. यशवंत थोरात, रामचंद्र गायकवाड, कृष्णराव घाटगे, डॉ.भारत जाधव, डॉ.शिवलिंग मेनकुदळे, चंद्रकांत वाव्हळ, डॉ.भाऊसाहेब कराळे, विलास महाडीक, डॉ. गणेश ठाकूर, तुकाराम कन्हेरकर, प्रा.डॉ.काळूराम कानडे, नामवंत व्यक्तीच्या बरोबरीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र अॅन्थोनी अॅलेक्स डिसोझा यांची एकमेव निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यांत आला.

    कॉलेज जीवनापासून शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेतृत्व करीत काम करणारे अॅन्थोनी डिसोझा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष, मतदारसंघ अध्यक्षपद राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्षपद अशी महत्त्वाची पदे भूषवून प्रत्येक पदाला न्याय दिला.शिक्षक मतदरसंघातील बाळाराम पाटील यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

Leave a Reply

Close Menu