‘संजयची चावडी‘तून मालवणी भाषा अमेरिकन वेबसाईटवर

      टेक्सास तसेच डल्लास या अमेरीका येथील शहरातील मूळ महाराष्ट्रीयन नागरिकांनी मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेचे जतन, शिक्षण आणि प्रसारण करणे तसेच तेथील स्थानिक मराठी कलाकार आणि व्यावसायिक यांना प्रोत्साहन देऊन जागतिक व्यासपिठ उपलब्ध करुन देणे या हेतूसाठी ‘महामाझा‘ (ण्द्यद्यद्रः//थ्र्ठ्ठण्ठ्ठथ्र्ठ्ठन्न.दड्ढद्य) ही वेबसाईट सुरु केली आहे. याचे उद्घाटन सुप्रसिद्ध संगितकार अशोक पत्की यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने १ जुलै रोजी झाले. सदर वेबसाईटसाठी अमेरीका येथे स्थायीक असलेले रंजन (देवदत्त) नाबर, पुर्णिमा मोंडकर-नाबर, आशुतोष परब आणि दिशा परब तसेच संपूर्ण ‘महामाझा‘ टिमने विशेष प्रयत्न केले आहेत. उद्घाटन कार्यक्रमाची जिंगल लेखन मूळचे सिंधुदुर्गचे सुपुत्र मंदार वाडेकर यांनी तर अशोक पत्की यांनी संगितबद्ध केले असून ऋषिकेश रानडे यांनी स्वरबध्द केले आहे.

         या वेबसाईटवर ‘संजयची चावडी‘ हे मालवणी भाषेतील व्यंगचित्राचे सदर असून यामध्ये वेंगुर्ल्याचे सुपूत्र संजय गोविंद घोगळे यांची व्यंगचित्रे प्रसिध्द होणार आहेत. श्री.घोगळे हे मुंबई येथे शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांची ‘संजयची चावडी‘ ही मालवणी भाषेतील व्यंगचित्रे प्रसिध्द आहेत. या उपक्रमात आपल्याला सक्रिय सहभागी होण्याची इच्छा असल्यास थ्र्ठ्ठण्ठ्ठथ्र्ठ्ठन्नद्वद्मठ्ठऋढथ्र्ठ्ठत्थ्.डदृथ्र् या इमेलवर संफ साधण्यात यावा असे आवाहन श्री. घोगळे यांनी ‘महामाझा‘ या टिमच्यावतीने केले आहे.

Leave a Reply

Close Menu