Exif_JPEG_420

वेंगुर्ला तालुक्यासह शहरामध्ये शनिवारी रात्रीपासून पडणा-या मुसळधार पावसाने नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. वेंगुर्ला शहरातील ओहोळातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने सदरचे पाणी रस्त्यावरुन वहात होते. तर आजूबाजूच्या घरांमध्येही पाणी शिरण्याचे प्रकार घडले.

      शहरातील वेंगुर्ला-तुळस मार्गावर असणा-या साकवाचे पाणी रस्त्यावर आल्याने छोट्या गाड्यांच्या वाहतुकीस अथडळा निर्माण होत होता. नजिकच्या दिगंबर रेडकर यांच्या घरामध्ये व गिरणीमध्ये पाणी गेले. तर रुपेश गोलतकर, बाळा रेडकर, सिद्धेश रेडकर अनिल कासकर, साईराज कासकर, वासुदेव कासकर, सुनंदा गावडे व प्रथमेश गुरव यांच्या घरासमोर पाणीच पाणी झाले होते. काही दुकानांमध्येही किरकोळ स्वरुपात पाणी गेले. साकव पुलानजिक असलेल्या काही कॉम्प्लेक्स आवारही जलमय झाला आहे. तसेच अनेक ठिकाणची शेती या पावसामुळे पाण्याखाली गेली असून पाऊस ओसरला नाही तर शेतीचे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नागरीकांनी धाव घेत येथील घरांमध्ये पाणी जाऊ नये यासाठी मदत कार्य केले.

Exif_JPEG_420

Leave a Reply

Close Menu