पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश

आज सकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. दुपारी एक ते दिड वाजताच्या सुमारास तुळस नदीला आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे नदीच्या दुतर्फा पुराने रौद्ररुप धारण केले होते. येथील फौजदारवाडीतील शुभम परब व चुडजीवाडीतील दिनेश चुडजी हे दोघे युवक पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुरातून वहात असताना जकातनाक्यावरील हरी तांबोसकर व सौरभ सावंत यांनी पाहिले. लागलीच या दोघांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना बाहेर काढले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Leave a Reply

Close Menu