वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथे भाड्याने राहणा-या एका ट्रक चालकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी सामंत-माईणकर यांनी दिली आहे.

    दरम्यान, ही व्यक्ती मालवाहू गाडी घेऊन कुडाळ-एमआयडीसी ते वेंगुर्ला अशी ये-जा करीत असल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. त्या रुग्णाच्या शेजारी राहणा-या सर्वांच्या आरोग्य तपासण्या करण्यास सुरुवात केली आहे. वेंगुर्ला-भटवाडी भागात राहणारा हा रुग्ण कोल्हापूरचा असून तो येथे कामानिमित्त एकटा राहतो. दोन दिवसांपूर्वी त्याला ताप येऊ लागल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेला होता. मात्र, त्याची प्रकृती जास्तच बरी नसल्याचे लक्षात आल्याने त्याला तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याचा स्वॅब रिपोर्ट १६ जुलै रोजी रात्री पॉझिटिव्ह आला. 

      ७ जुलैपासून ती व्यक्ती आजार असून गेले ४ दिवस तो घरात झोपून होता अशी माहिती शेजारील माणसांनी दिली.

Leave a Reply

Close Menu