विकासकामांची ऐशीतैशी

सिधुदुर्ग जिल्ह्याचा दिवसेंदिवस विकासाच्यादृष्टीने कायापालट होत आहे. कधीकाळी सागरी महामार्गावर अवलंबून असलेल्या वाहतुकीचे चित्र पालटू लागले. नंतर आलेल्या रेल्वे महामार्गाने तर कोकणच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका बजावली. चिपीच्या पठारावर विमानतळही अस्तित्वात आले आणि आता सुरु असलेले चौपदरीकरण पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे सर्व सत्यात उतरविण्यासाठी बराच संघर्षसततच्या पाठपुराव्याबरोबरच स्थानिकांनी आपल्या जमिनीही दिल्या आहेत. काहींची राहती घरेही या प्रकल्पांमध्ये गेली. खरेतर विमानतळामुळे पर्यटनाच्या संधीही सिधुदुर्गामध्ये उपलब्ध होणार आहे. पण त्या दृष्टीने सरकारची मानसिकता दिसून येत नाही. सिधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे. परंतु पर्यटन जिल्ह्याचे सुनियोजित धोरण कुठेच राबविलेले दिसत नाही. सीआरझेडच्या कटकटींमध्ये सिधुदुर्गच्या पर्यटनाची शोभा वाढविणा-या स्थानिकांच्या मागण्यांचा मात्र तितकासा विचार होताना दिसत नाही.

          संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी हवाई वाहतुक अखेर सिधुदुर्गात अस्तित्वात आली. यासाठी सुरुवातीपासूनच बरेच राजकीय वादविवाद झाले. अगदी स्थानिकांच्या सातबारावरुन ते विमान उतरविण्याच्या श्रेयवादाने चिपी विमानतळ  ाकाशझोतात राहिले. सन २०१८मध्ये गणशे चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर थेटविघ्नहर्त्यालाच विमानातून आणून पहिले विमान या चिपी विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर प्रवासी विमाने उतरविण्यासाठी ब-याच राजकारण्यांनी आश्वासने दिली. परंतु अद्यापपर्यंत आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. हा प्रकल्प सिधुदुर्गच्या सागरी किनारपट्टीलगत असल्याने जिल्ह्याचा उर्वरित भाग विकास प्रक्रियेत येणे अपेक्षित आहे. याच विकासप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे महामार्गाचे चौपदरीकरण. दरवेळी खड्डयात रस्ता कीरस्त्यात खड्डा‘ अशी स्थिती असलेल्या सिधुदुर्गात कायमच खापर पावसावर फोडले जाते. पण कोकणातला पाऊस हा कोकणवासीयांनाही नविन नाही आणि नाही राजकारण्यांना. मग पाणी मुरते कुठेहा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चौपदरीकरणाचे काम करताना नेहमीच्या पारंपरिक डांबरीकरणाऐवजी झटपट होणा-या सिमेंटच्या रस्त्यावर भर दिला आणि बांधकाम सुरु झाले.

          सिधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणाचा पहिला टप्पा झाराप ते पेडणे असा पूर्ण करण्यात आला. या चौपदरीकरणाने सावंतवाडी दुर्लक्षिली जाईल अशी जोरदार चर्चा झाली होती.  असे असले तरी इन्सुली घाटातील वाहतुक ब-यापैकी कमी झाल्याने येथील अपघातांचे प्रमाण कमी झाले. या महामार्गाचा दुसरा टप्पा झाराप ते रायगडपर्यंत असा सुरु करण्यात आला. हे चौपदरीकरणाचे काम सिधुदुर्ग जिल्ह्यात दिलीप बिल्डकॉन ही कंपनी करत आहे. गोव्यातील चौपदरीकरणाचे कामही याच कंपनीने केले. साहजिकच गोवा व सिधुदुर्गातील चौपदरीकरणाच्या कामाबाबतत्या कामाच्या दर्जाबाबत कायमच तुलना होत आहे. कारणराजकीय पुढा-यांसोबत नागरिकांनी सिधुदुर्गातील रस्त्याचे निकृष्ट काम वेळोवेळी निदर्शनास आणून दिले.

        गतवर्षी कणकवलीतील महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने महामार्ग अभियंत्यांच्या अंगावर चिखलफेकीची घटना घडली. या प्रकरणाला एक वर्ष होते न होते तोच कणकवलीतीलच ब्रिजच्या भितीचा काही भाग  कोसळला. सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही. गेले कित्येक दिवस कणकवलीवासियांमधून महामार्गाच्या गलथान कारभाराबाबत सातत्याने प्रशासन व ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधण्याचे काम सुरु होते. त्यासाठी अनेक बैठकाही पार पडल्या. आरटी फॅक्ट कंपनीचे अधिकारी एन.पी.सिग यांनी काही दिवसांपूर्वी कणकवली शहरात हायवेची पहाणी केली होती. त्यावेळी बॉक्सेल ब्रिजला धोका नसल्याबाबत प्रांताधिकारी यांच्या समोर हमी दिली होती.  असे असतानाच ब्रिजचा काही भाग कोसळला. सदरची घटना घडल्यानंतर लगेचच आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी धाव घेत आक्रमक पवित्रा घेतला. क्वालिटी कंट्रोलचे सर्टिफिकेट दाखविल्याशिवाय तुम्ही फ्लाय ओव्हरवरुन वाहतूक सुरु करुन दाखवाच अशा इशाराही प्रांताधिकारी यांना दिला. तर नागरिकांची पिलरची मागणी असतानाच ठेकेदाराने बॉक्सेल भिती बांधल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला.

    एकंदरच येथील स्थानिकांनी सिधुदुर्गच्या विकासासाठी मोबादला घेतला असला तरी आपल्या जमिनीघरे त्यासाठी दिली आहेत. मात्रत्यांच्या जमिनीत होणारा विकास नागरिकांच्या जीवावर बेतणारा दिसून येत आहे. हे काम उत्कृष्ठ दर्जाचे होण्यासाठी स्थानिक आमदारांबरोबरच खासदारपालकमंत्री यांनी याकडे तेवढ्याच आत्मियतेने लक्ष टाकणे गरजेचे आहे.

      कोरोनामुळे सध्या नविन विकासकामांना खिळ बसली तरी रखडलेली आणि सध्या सुरु असलेली विकासकामे चांगल्याप्रकारे होण्यासाठी पक्षांतर्गत हेवेदावे बाजूला ठेऊन जिल्ह्यातील सर्व आमदारखासदार आणि पालकमंत्री यांनी एकत्र येत विकासकामे मार्गी लावावीत.

     केवळ अधिकारीठेकेदाराला जमाव करुन खडसावणेत्याचा व्हिडीओ व्हायरल करणे अशा लक्षवेधी ठरणा-या कृतीमध्येच जिल्ह्यातील बहुतेक राजकारणी अडकलेले दिसतात. वास्तविक अशा कर्तव्यात कसुर करणा-या अधिका-यांवरनिकृष्ठ काम करणा-या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करुन विनाविलंब कठोर कायदेशीर कारवाई कधी होणारजिल्हावासीयांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण कामाची हमी कधी मिळणारया प्रतिक्षेत सर्वसामान्य जनता आहे.

Leave a Reply

Close Menu