वेंगुर्ला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह येथील कोव्हिड केअर सेंटर येथे स्वब कलेक्शन सेंटर सुरु करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे. यामुळे आता वेंगुर्ला येथील संशयित अथवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासीतांचे स्वॅब घेण्याकरिता ओरोस येथे जाण्याची गरज भासणार नाही.

       वेंगुर्ला मुख्याधिकारी वैभव साबळे हे होम क्वारंटाईन असल्याने त्यांचा स्वॅब घेऊन याचा शुभारंभ करण्यात आला. तसेच शहरातील भटवाडी येथे आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासितांचे स्वॅब असे एकूण ९ स्वॅब घेण्यात आले. हे स्वॅब तपासणीकरीता सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे पाठवले आहेत. पुढील स्वॅबही इथेच वेंगुर्ल्यात घेतले जातील असे डॉ.माईणकर म्हणाल्या.

Leave a Reply

Close Menu