इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी गौरी मराठे

इनरव्हील क्वब ऑफ वेंगुर्ल्याच्या नुतन कार्यकारीणी निवडीची सभा साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात यांच्या इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वृंदा गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत क्लबच्या सन २०२०-२१ या वर्षासाठी नुतन कार्यकारीणीची निवड एकमताने करण्यात आली. या कार्यकारीणीत अध्यक्षपदी गौरी मराठे, उपाध्यक्षपदी अक्षया गिरप, सचिवपदी पुनम जाधव, खजिनदारपदी स्मिता दामले, आय.एस.ओ.पदी समिक्षा वालावलकर यांचा समावेश आहे.

      या नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा सावंतवाडीच्या प्रमुख पाहुण्या विद्या करंदीकर व जि.प.अध्यक्षा समिधा नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाने स्वतःची ओळख देणारा असा वेंगुर्ले बंदर, लाईट हाऊस व श्रीदेवी सातेरी यांचा फोटो समाविष्ठ असलेल्या फ्लँगचे प्रकाशन प्रमुख पाहुण्या विद्या करंदीकर, जि.प.अध्यक्षा समिधा नाईक, इनरव्हील क्लब अध्यक्षा गौरी मराठे यासह पदाधिका-यांच्या हस्ते झाले.

      यावेळी अन्य कार्यकारीणी पदाधिकारी खजिनदार स्मिता दामले, आय.एस.ओ.समिक्षा वालावलकर, सी.सी.सी.सी. डॉ.पुजा कर्पे, आय.पी.सी वृंदा गवंडळकर, जॉईन सेक्रेटरी डॉ.अपसान कौरी, सदस्या अंकिता बांदेकर, सई चव्हाण, ज्योती देसाई, राधिका लोणे, आदिती रेडकर, आकांक्षा परब, राधा सावंत, संचया राऊळ, उल्का वाळवेकर, मानसी परब, तसेच रोटरीयन आनंद बांदेकर, प्रा.वसंतराव पाटोळे, सुरेंद्र चव्हाण यांचा समावेश होता.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ.पुजा कर्पे यांनी तर आभार नगरसेविका पूनम जाधव यांनी मानले.

      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात व ग्रामीण भागात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत, ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य नर्स ए.ए.काणेकर, एस. एस. मांजरेकर, अधिपरीचारीका पी.पी.मांजरेकर, श्वेता नार्वेकर, शालिनी अणसुरकर, अमिता मुणगेकर, पूजा सावंत, रुपाली धोंड, सुखदा पेडणेकर, स्टाफ नर्स प्राजक्ता राऊळ, समुपदेशक अश्विनी शेटकर, आरोग्यसेविका विनिता तांडेल, संजना मोचेमाडकर, फार्मासिस्ट मोहिनी शेगले, लॅब टेक्नीशियन प्रणाली चिपकर, हिंदलॅब नर्स निलीमा भाटकर तसेच अंगणवाडी सेविका स्मिता कोणेकर, नयना आरेकर, निलम कामत, विद्या फाटक, रीटा आल्मेडा, अँल्फीना फर्नाडीस, उज्वला पालव या शहरातील अंगणवाडी सेविकांचा कोरोना योद्धा म्हणून शिल्ड व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu