वेंगुर्ल्यात रुग्णपयोगी साहित्य केंद्राचा शुभारंभ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्यावतीने वेंगुर्ला हॉस्पिटल नाका येथे रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश नवांगूळ यांचे हस्ते २६ जुलै रोजी याचे उद्घाटन करण्यात आले.

      या केंद्राद्वारे वॉकर, कमोड चेअर, व्हील चेअर, ई. साहित्य गरजू व्यक्तिना माफक अनामत रक्कम व अत्यल्प सेवाशुल्कामध्ये उपलब्ध होणार आहे. उद्घाटनप्रसंगी  समितीचे जिल्हा सहकार्यवाह चिन्मय पणशीकर, प्रकल्प समिती कार्यकर्ते संजय ऊर्फ भैय्या शिरसाट, विजय मोरजकर, आशिष पाडगावकर, शंकर (आबा) मांजरेकर, किरण शिरोडकर तसेच संघाचे तालुका कार्यवाह मंदार बागलकर आदी उपस्थित होते. गरजू व्यक्तिनी या केंद्राच्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. साहित्य मागणीसाठी गरजूंनी किरण शिरोडकर (९३७३७३४४८८), विजय मोरजकर (९९२१५३०२७४) किवा शंकर मांजरेकर (९४०४३९६४३३) यांच्याशी संफ साधावा.

Leave a Reply

Close Menu