इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्यावतीने रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर निसर्गाशी सुसंवाद साधण्याच्या व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने ‘‘इको फ्रेंडली राखी‘‘ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी नैसर्गिक पाने फुले वापरता येतील. निसर्गातील इतर पर्यावरणपूरक वस्तू वापरता येतील. तसेच धान्य, डाळी, फळे, फुले, पालेभाज्या, बिया, मातीचे प्रकार व तत्सम वस्तूही वापरता येतील. यावेळी नाविन्यपूर्ण वस्तू वापराव्यात जेणेकरुन स्पर्धकांना प्राधान्य मिळेल. तसेच प्लास्टिक, थर्माकोल किवा ज्या वस्तू विघटन होत नाहीत अशा वस्तू वापरु नयेत.  २ ऑगस्ट पर्यंत स्पर्धकांनी येथील एल.पी.स्पोर्ट्स ऑफिस, आम्रतरु कॉम्प्लेक्स, वेंगुर्ला येथे सकाळी १० ते दुपारी २ व दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत जमा करावीत. अधिक माहितीसाठी गौरी मराठे (९०४९३१६८००) व पूनम जाधव (८८८८५०७३३४) यावर संफ साधावा.

Leave a Reply

Close Menu