वेंगुर्ला तालुक्यात ३ ऑगस्टपासून रात्री सोसाट्याच्या वा-यासह सुरु झालेल्या पावसाने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यात १२८.४ मिमी पाऊस पडला असून एकूण २८२२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

    तालुक्यातील आरवली येथील सुरेश रघुनाथ गोडकर यांच्या घरावर झाड पडून ४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले. पेंडूर येथील पुंडलिक सावंत व अंकुश नेमण यांच्या घरावर झाड पडून ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. वेंगुर्ला शहरातील रमा गोपाळ कन्याशाळा एकात्मिक बालविकास प्रकल्प स्वच्छतागृहावर फणसाची फांदी पडून नुकसान झाले आहे. तसेच मठ बोवलेकरवाडी येथे पहाटे मुख्य रस्त्यावर आंब्याचे झाड पडल्याने वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी झाड बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. तर वेंगुर्ला शहरातील कुबलवाडा येथील पुरुषोत्तम गावडे व खिमजी भानुशाली यांच्या राहत्या घरावर झाड पडून नुकसान झाले. 

Leave a Reply

Close Menu