पुतळा हटविण्याच्या कृत्याचा वेंगुर्ल्यात निषेध

बेळगाव जिल्ह्यातील एका गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरुन रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये ठिकठिकाणी याचा निषेध केला जात आहे. आज वेंगुर्ल्यातही याचे तीव्र पडसाद उमटले. वेंगुर्ला तालुका शिवसेनच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरेप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच यावेळी शिवाजी महाराजांचा विजय असोकर्नाटक सरकारचा निषेध असो आशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या.  

      यावेळी तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परबउपजिल्हाप्रमुख सुनील डुबळेजिल्हा पदाधिकारी सचिन वालावलकरशहरप्रमुख अजित राऊळशहर समन्वयक विवेक आरोलकरउपतालुकाप्रमुख संजय गावडेउमेश नाईकतुळस विभाग प्रमुख संजय परबयुवासेना उपतालुका अधिकारी दादा सारंगहेमंत मलबारीअभिनय मांजरेकरदिलीप राणेगजानन गोलतकरदेवदत्त जुवलेकरअभिमन्यू भुतेछोटू कुबल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu