स्वच्छतेची रक्कम विकासकामांवर खर्च करण्यास परवानगी मिळावी

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने आतापर्यंत सर्वोत्कृष्ट काम केले आहे. मागील ३ वर्षात केलेल्या या कामगिरीसाठी प्रोत्साहनपर भरघोस असे सव्वा सहा कोटी रुपयांचे बक्षिस प्राप्त झाले आहे. सदरील बक्षिसाची रक्कम वितरीत करतेवेळी शासनाकडून ती खर्च करण्याच्यासाठी मार्गदर्शक सूचना ठरवून दिल्यानुसार त्या रक्कमेचा वापर स्वच्छता व त्यांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी होत आहे. ५ लाख पर्यंतचीच रक्कम नगरपरिषद स्तवरावर खर्च करण्यास मूभा आहे. त्यावरील रक्कमेचे काम करावयाचे झाल्यास त्याला राज्य शासनाची मान्यता घ्यावी लागत आहे. या अटीमुळे आणि दप्तर दिरंगाईमुळे कामे करताना ब-याच अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे २५ लाखापर्यंत रक्कम नगरपरिषदस्तरावर खर्च करण्यास अनुमती मिळावी. तसेच या बक्षिस रक्कमेतील ५० टक्के रक्कम शहराच्या इतर पायाभूत विकास कामांवर खर्च करण्यास मुभा मिळावी. त्यामुळे खोळंबलेली विकास कामे मार्गी लागतीलअशा आशयाचे निवेदन सिधुदुर्ग दौ-यावर आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरपनगरसेवक प्रशांत आपटेसुहास गवंडळकर यांनी भेट घेऊन सादर केले.

      सदरचे निकष बदलून मिळण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करु असे आश्वासन माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Leave a Reply

Close Menu