पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक अरुण सावळेकर यांनी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील खास महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. महिलांनी कोणत्याही विषयावर मर्यादित शब्दांत कथा लिहून ती २० ऑगस्टपर्यंत (वाढीव मुदत) साप्ताहिक किरातच्या kirattrust@gmail.com या ईमेलआयडीवर किवा (सीमा मराठे) ९६८९९०२३६७   या व्हॉटस्अॅप नंबरवर पाठवावी. यासाठी वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.

      स्पर्धेतील विजेत्या महिलांना अनुक्रमे ८०१, ७०१, ६५१ तसेच तीन विजेत्यांना अनुक्रमे ३५१, ३०१, २५१ अशी पारितोषिके देण्यात येणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना अरुण सावळेकर लिखित नाट्यरंगया दीर्घांकिकेची प्रत भेट म्हणून दिली जाणार आहे. तसेच बक्षिसपात्र कथांचा किरातच्या दिवाळी अंकामध्ये करण्यात येणार आहे. ही स्पर्धा सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांकरीताच मर्यादित आहे याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Close Menu