कलादालन पर्यटक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या बाजूला साकारलेल्या तालुक्याचा ऐतिहासिक वारसा सांगणा-या विविध ठिकाणांच्या प्रतिकृतींचा समावेश असलेल्या आकर्षक कलादालनाचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला. या कलादालनात वेंगुर्ला नगरपरिषदेचे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ल्याची खाद्यसंस्कृती, मठ गावचा शिलालेख, कॅथलिक चर्च, वेंगुर्ल्याची सागर संपत्ती, श्रीदेव सागरेश्वर, वेंगुर्ल्यातील मारुती मंदिरे, श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ, वेंगुर्ल्यातील किर्तीवंत, श्रीदेव मानसीश्वर, डच वखार, नगरवाचनालय, श्रीदेव रामेश्वर मंदिर, श्रीदेवी सातेरी मंदिर, वेंगुर्ला बंदर, दीपगृह, ऐतिहासिक नगरपरिषद इमारत, सातेरी मंदिर, श्री जैतिर देवस्थान तुळस, कोकणातील गाव-हाटी, रेडीचा द्विभुज गणपती, आरवली वेतोबा देवस्थान, लोककला दशावतार, भजन मंडळ आदीच्या माहिती सहित प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. एकाच छताखाली वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटन स्थळे, लोकजीवन आणि सांस्कृतिक दर्शन हे येणा-या पर्यटकांना पहायला मिळणार आहे.

यावेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, तहसीलदार प्रवीण लोकरे,  दोडामार्ग उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, मालवण मुख्याधिकारी जावडेकर, देवगड मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, दोडामार्ग मुख्याधिकारी शिवराज गायकवाड, कुडाळ मुख्याधिकारी नितीन गाढवे, वेंगुर्ल्याचे सर्व नगरसेवक एम.आय.टी.एम.प्राचार्य सूर्यकांत नवले आदी उपस्थित होते.

      वेंगुर्ल्याच्या विकासात सर्व नगरपरिषद कार्यकारिणीची एकजूट दिसून आली आहे. अशीच एकजूट जिल्ह्यातील प्रत्येक नगरपरिषदेत दिसावी. म्हणजे पर्यायाने सिधुदुर्गचा नावलौकिक वाढेल. वैशिष्ट्यपूर्ण कलादालन साकारताना स्थानिक कलाकारांना दिलेले व्यासपीठ हे कौतुकास्पद आहे. त्याच धर्तीवर पुढील एका वर्षात सावंतवाडी येथील कलादालनाचे सुशोभीकरण करणार असल्याची प्रतिक्रिया सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केली.

        वेंगुर्ल्याचा विकास करताना सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेऊनच आम्ही ५ वर्षांचे नियोजन केले व त्यादृष्टीने वाटचाल सुरु आहे. मल्टिपर्पज हॉल, मच्छिमार्केट, क्रिडा संकुल अशा सुरु असलेल्या विकासात्मक बाबींमधील कलादालन हा भाग आहे. या दालनात असलेल्या कलाकृती या स्थानिकांच्याच कल्पनेतील आहे. भव्यदिव्य अस्तित्वात नसलेले दाखविण्याऐवजी जे आहे तेच मांडण्याचा प्रयत्न याठिकाणी केला आहे. पिकतं तिथे विकत नाही हा समज आम्ही खोटा ठरविण्याचे ठरविले आहे. अर्थात, यासाठी आमच्या सर्व नगरसेवक टीम सोबतच नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले आहे. पुढील काळात पर्यटक, विद्यार्थी यांना हे कलादालन निश्चितच मार्गदर्शक ठरेल अशा विश्वास नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केला.

      ऐतिहासिक महत्त्व असलेल्या क्रॉफर्ड मार्केट इमारतीत हे कलादालन साकारले असल्याने ख-या अर्थाने या वास्तूला  हेरिटेज महत्त्व प्राप्त झाले असल्याचे तहसिलदार लोकरे यांनी सांगत शुभेच्छा दिल्या. सदरचे कलादालन साकारण्यासाठी सहाकार्य  करणा-या कलादिग्दर्शक तथा जे.जे.स्कुल ऑफ आर्टस्चे माजी प्राध्यापक सुनील नांदोस्कर, मूर्तिकार मनोज राजापुरकर, उदय पाटील, शरद मेस्त्री, ग्राफिक्स डिझायनर प्रसाद परब, आशीर्वाद डिजिटलचे रवी वारंग, कलाकृती साकारणारे दिगंबर कासकर, भास्कर गावडे, पवन नवार, प्रशासनाच्यावतीने संगीता कुबल, साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे, नगरसेवक प्रशांत आपटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे तर प्रास्ताविक नगरसेवक विधाता सावंत यांनी केले.

 

 

This Post Has 4 Comments

  1. At least people knows the richness of Vengurla.
    Great Great and The great!

  2. The clean n beach town in Sindhudurga district, Vengurla depicted beautifully here… Thank you to the creators of this art to have captured the culture of Konkan. The costal Maharashtra of India is blessed with amazing beaches and gods grace showered with self proclaimed (Swambhu) temples adds to the scenic beauty of the region. A must vist place in Maharashtra of India.

  3. Very nice Excellent…..!!!!

Leave a Reply

Close Menu