►वेंगुर्ला मुख्याधिकारीपदी डॉ. अमितकुमार सोंडगे

वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांची मंडणगड येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांची नियुक्ती केली होती. डॉ.सोंडगे यांना १२ ऑगस्टला हजर होण्याचे नगरविकास सचिव यांनी पत्र दिले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करुन त्यांनी १७ ऑगस्ट रोजी कार्यभार स्विकारला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, प्रशांत आपटे, विधाता सावंत, नागेश गावडे, शैलेश गावडे, तुषार सापळे, दादा सोकटे यांनी नुतन मुख्याधिकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

                      

Leave a Reply

Close Menu