वेंगुर्ल्यात नुकताच नुतन मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्विकारलेल्या डॉ.अमितकुमार सोंडगे यांचा सोमवारी (दि.१७) अजब फिल्मस्टाईल स्टंट नागरिकांना पाहायला मिळाला. शहराची ओळख करुन घेताना आपल्या कंबरेला बंदूक (रिव्हॉल्वर) अर्धी आत व अर्धी बाहेर अशी गँगस्टर स्टाईलने अडकवत बाजारासहीत इतर ठिकाणी त्यांनी फेरफटका मारला. याबाबत स्थानिक व्यापा-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

      शांत आणि सुसंस्कृत शहरात एका प्रशासकीय अधिका-याने बंदूक घेऊन फिरणे हा प्रथमच पकार पाहायला मिळाल्याने या विषयाची शहरात सर्वत्र चर्चा सुरु आहे. वेंगुर्ला शहर हे गुंडांचे शहर नाही. त्यामुळे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही अशा प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. ही बाब व्यापारी, नागरिकांनी नगरसेवकांच्या कानावर घातली आहे.

 

This Post Has One Comment

  1. Punish him.
    Such people are problem for peace.
    Condemn his behaviour.

Leave a Reply

Close Menu